कशी सुरुवात करु कळत नाहिये

पण आज खुप काही बोलायच आहे.....

जे या 13 वर्षात घडलं नाही

ते तुला सांगायच आहे.....

तु आम्हाला सोडून गेला

यासाठी तुला भांडायच आहे.....

तुझा तो मायेचा हात

मला अनुभवायचा आहे.....

मी केलेल्या चुकी साठी

तुझा ओरडा खायचा आहे.....

तुझ्या रागावण्यतल प्रेम

कस असेल हे जाणून घ्यायच आहे......

आज खुप काही बोलायचं आहे...

लोक म्हणतात,

मुलीच आणी बाबांच नात

खुप special असतं

हे नात मला एकदा

अनुभवायच आहे....

मला ही तुझ मन ओळखून

तुझ्या डोळ्यतील भाव वाचायचे आहेत....

मला ही बाबांची लाडकी म्हणवून

घ्यायचे आहे.....

आज खुप काही सांगायच आहे.........

तु आम्हाला सोडून गेला

यासाठी तुला भांडायच आहे....

तुझी तक्रार तुला च करायची आहे

तु दिलेली हाक पुन्हा ऐकायची आहे...

तु चालण्यासाठी दिलेला हाथ पुन्हा

एकदा हवा आहे....

आज तुझी साथ हवी आहे....

माझी आर्त साद ऐकुन

प्रतिसाद देशील???

माझा शेवटचा हा एक हट्ट पुर्ण

करशील???

बाबा बोल ना.....

परत एकदा माझ्या आयुष्याच्या

सिनेमा चा हीरो होशील???

बाबा फ़क्त एकदा

फ़क्त एकदाच

परत येशील.....????

- नान्नजकर विभा

9



  9

Profile of :)
:)  •  4y  •  Reply
खऱ्या आणि निरागस भावना
Profile of Noizeee Boy
Noizeee Boy  •  4y  •  Reply
Masst 😊 Real EmotionS😇🙏
Profile of Ismail Gorikhan
Ismail Gorikhan   •  4y  •  Reply
👍👍