मेघ नसता वीज नसता ।

profile
Ajinkya Mirajkar
Jan 18, 2020   •  3 views

मेघ नसता विज नसता मोर
नाचु लागले
जाहले इतुकेच होते की
तुला मी पाहिले

गोरटया गालांवरी का
चोरटा हा नकटिमा
तु मला चोरून बघताना
तुला मी पहिले

एवढे नाजुक आहे वय तुझे
माझ्या फुला
रंग देखील पाकळ्यांवर
भार वाटु लागले

लाख नक्षत्र उराशी नभ
तरी ही हळहळे
हे तुझे नक्षत्र वैभव
का धरेवर राहिले

पाहता तुज़ रंग उडुनी
होइ गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या
उरातील बघ सुगंधु लागले

भर पहाटे मी फुलांनी
दृष्ट काधुन टाकली
पाहती स्वप्नि तुला जे
भय तयांचे वाटले

मेघ नसता विज नसता मोर
नाचु लागले
जाहले इतुकेच होते की
तुला मी पाहिले

संदिप खरे
0



  0