आमची भेट झाली तेव्हा

आमची भेट झाली तेव्हा संध्याकाळ होती

दोन ह्रदयांना जोडणारी एक नाळ होती

धाडसच न्हवत होत तिला भेटायचं

ती बोलली प्रेमात प्रेमाने पेटायचं

पत्र छान लिहिली तू सख्या पण म्हटली

एकाच जागी आपण जगूया ना एक क्षण!

पेटून उठलो जागा झालो उडवून टाकली भीती

हळू हळू बनवू लागलो तिला भेटायची निती.

मैत्रिण मी तिचा आणि ती माझा मित्र

भेट घडवून आणायची तर डाव आखले विचित्र.

शेवटी पडलो बाहेर मी तीही तेव्हा निघाली

पोहचून तिथे मी तिच्यात माझी जिंदगी पाहिली

हसायची उगाचच मग मी ही हसायचो

तिच्या या जाळ्यात मी ही फसायचो.

मधेच तिच्या डोळ्यात चटकन अश्रू आले

मी तिला म्हटले..सखे सांग काय झाले?

मी नेम्ही अशीच असते लोकं ठेवतात नावं

म्हणतात चार लोकात पोरी जरा नीट राहावं!

सखे मीच तुझा चार लोक आहे असं मान

मला डोळा मार आणि हास पुन्हा छान!

हेच तू करतो सख्या आणि मी भारावून जाते

मन हरवल्यावर हृदयात तुझीच वाट पाहते.

मला पण अगं सध्या झोपच येत नाही

तुझ्याच बद्दल मी वेडा विचार करत राही.

हाहाहा...आम्ही दोघे जोरात हसलो!

वायफळ आम्ही उगाचच चरचा करत बसलो!

आली जायची वेळ तिच्या डोळ्यात आला पाणी

माझे ही अश्रू होतेच गात मिस यू ची गाणी.

भेटू पुन्हा असच नक्की मी आता जाते

कसं सांगू तिला तू तर माझ्या हृदयात राहते!

Situations

Situations are part of life,
They are there to make you strong,
Stay united and see the magic,
The difficulties won't last long.

Experience counts respect it,
See the beauty created by the stones,
And you'll start exploring them,
And you'll never fall alone.

There is no need to be afraid,
Stand upright and fight for right,
Truth always triumphs,
You'll win and everything will be alright.

- Tushar D. Kadam

तुझ्या सुंदर केसांबद्दल मी काय बोलू!

तू त्यांना किती जपलं असशील. तुझे प्रेमळ हात सतत त्यांच्या नशिबी असतात. तुला नेहमीच पाहत असतील ना ते? लांब , सुंदर , मखमली!

मला ईर्ष्या वाटते तुझ्या केसांची. नको..ईर्ष्या नको.' तुझे' केस आहेत ना! बरं....हेवा वाटतो. नेहमी असतात तुझ्या सोबत. तू हसताना पाहत असतात तुला. लपून, लाजून , हासून !

वाऱ्याचा बहाणा देऊन राहू पाहतात तुझ्या ओठांवर. निर्जीव आहेत तर काय झालं? अपराध तर करतातच ना ते तुझा आणि माझा संवाद थांबवण्याचा.. अपराधी, बेशिस्त, बेजबाबदार!

आणि आठवतोय मला चांगलाच तो क्षण जेव्हा तुझ्या नयानातून अश्रू वाहत होते. पण त्या वेळी तुझ्या केसांच भलतंच कौतुक वाटलं मला. कसे चाणाक्षपणे लपवतात तुझे अश्रू. जसे...ते...समजदार, कोवळणारे , मायाळू!

जेव्हा तुझी केसं लाजतात आणि एका बाजूला होतात..तेव्हा दिसते तुझी गोरी पाठ. विजेचे तेज शुभ्र! नजर नमन होऊन जाते. मी होऊन जातो निशब्द, आनंदी, स्तब्ध!

आणि जेव्हा केसांची वेणी होते तेव्हा तू दिसतेस एखाद्या लहान बालिकेसारखी. गोंडस आणि निरागस. तेव्हा आश्चर्य वाटते तुझ्या काळ्याभोर केसांचे. कसे ना ते एकत्र येतात आणि जपतात तुझा साधेपणा. सुंदर, सुंदर आणि फक्त सुंदर!

- तुषार कदम

एकाच खोलीमध्ये बसले

एकाच खोलीमध्ये बसले,

एकाच बाकावर.

तरीही त्यांचे लक्ष दोस्त हो,

आपल्याच यंत्रावर.

कोणी मनी दुःख साठवूनी,

पाही यंत्राच्या काचेवर .

रक्तमासाचा बसला माणूस,

नाही नजर त्याच्यावर.

एकांताला आले भरून,

म्हणे कसला हा खेळ!

मोठी लोकसंख्या दुर्मिळ संवाद,

काही बसतच नाही मेळ.

हरवल्या गोष्टी, भटकतात किस्से

का कट्टा असा शांत?

आपलेच ज्ञान करत आहे,

आपल्याच भावनांचा अंत.

- तुषारद. कदम

2  2

Profile of Sneha Potekar
Sneha Potekar  •  1y  •  Reply
खूप छान!