वाचा कवितेचं पान मध्ये म्हटल्या गेलेल्या सर्व कविता!

Read the lyrics of each and every poem recited in Kavitecha Paan.

कवितेचं पान हा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये बऱ्याच सुंदर कविता ऐकायला भेटतात. पण त्या ऐकता ऐकता पाहायला भेटल्या तर आनंद द्विगुणित होतो. मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे प्रत्येक एपिसोड मधल्या कवितांचा संच. एकाच पानात. हे सगळं फक्त कवितेच्या प्रेमापोटी.

तर चला आठवूया तो एपिसोड जिथे आपले सर्वांचे लाडके मिलिंद जोशी आले होते. या भागामध्ये म्हटल्या गेलेल्या सर्व कविता आपल्या साठी खाली सादर केल्या आहेत. या कविता त्या कवी व कवयित्रींची प्रतिभा आहे आणि त्याचा सन्मान आपण राखुया.

So, I would like to present you the poems recited by Milind Joshi in Kavitecha Paan.

source: Kavitecha Paan Youtube channel

KAVITECHA PAAN | कवितेचं पान - Episode # 12

Milind Joshi reciting his own poems

मिलिंद जोशी काव्यवाचन

कवी : ग्रेस, मिलिंद जोशी

Concept & Direction : Madhurani Gokhale - Prabhulkar

Camera : Prasad Jadhav,Alankar Misal,Snehal Kamble,Amol Sangre

Editing : Deepak Kolekar

Madhurani’s Costume : Merakee The Handloom Studio(Supriya Modak)
Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.

क्षितीज जसे दिसते

कवी:ग्रेस

क्षितीज जसे दिसते, तशी म्हणावी गाणी।

देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी ॥

गाय जशी हंबरते, तसेच व्याकुळ व्हावे ।

बुडता बुडता सांजप्रवाही , अलगद भरुनी यावे

येथून आपुले मार्ग निराळे

कवी: भाऊसाहेब

येथून आपुले मार्ग निराळे

रुचेल तिकडे जायचे।२।

भेदभाव हा विसरुनी अवघा

चल भेटूया अखेरचे।३।

जळलो असतो वितळलो असतो

कवी: मिलिंद जोशी

imagesource: www.milindjoshi.com

गिरी शिखरे मी उपडी केली

कवी: मिलिंद जोशी

गिरी शिखरे मी उपडी केली

सागर तळ पालथे घातले.

आकाशाचे टोक अजूनही मज सापडले नाही

मी तरी सोडले नाही.

झाडाचं पान जेव्हा

कवी: मिलिंद जोशी

मला शोधता शोधता ती

कवी: मिलिंद जोशी

imagesource: www.milindjoshi.com

मी शाळेत असतानाची गोष्ट

कवी: मिलिंद जोशी

imagesource: www.milindjoshi.com

मी शाळेत असतानाची गोष्ट

आमच्या घरजवळच राहणारी छान दिसणारी

माझ्या पेक्षा बरीच मोठी असलेली एक मुलगी

एक दिवस अचानक आमच्या वर्गावर

बी एड ची शिक्षिका म्हणून तासघायला आली.

तास संपे पर्यंत मी पाहत राहिलो ..

तास संपल्यावर भेटून तिच्याशी हॅन्डशेक केला

एक वेगळीच धडधड झाली काळजात

नक्की काय होता ते मात्र नाही कळलं.

त्यानंतर एक दोन वर्ष नंतरचा प्रसंग.

आकाशवाणीत बाळ विश्व कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंग साठी गेलो होतो.

त्याच रेकॉर्डिंग साठी आलेली एक मुलगी स्क्रिप्ट लिहीत होती.

माझी तंद्री लागली. नक्की कुठे पाहत होतो ते नाही कळलं.

पण ते लक्षात येताच ती लाजून हसली आणि म्हणाली " वेडाच आहेस!"

त्या ही वेळी मी वेद आहे म्हणजे नक्की काय आहे ते नाहीच कळलं.

मग एक दिवस आमच्या गावातल्या एका क्लाथ स्टोर्सचं

सिनेमातल्या हेरॉईनचं एक कॅलेंडर आमच्या घरातल्या भिंतीवर लागला.

ती नाही मला कधीच वेडा म्हणाली...

मग हळू हळू वेद असणं आवडू लागलं

आणि हे वेड लपवायचं असतं हे ही कळू लागलं.

कितीतरी वर्षांचा सहवास आहे आमचा

कवी: मिलिंद जोशी

कितीतरी वर्षांचा सहवास आहे आमचा

लग्न झालं तेव्हा त्या मानाने लहान होतो आम्ही

खूप लवकरलग्न व्हायची पूर्वी

हळू हळू इतकी सवय झाली एकमेकांची

की जरा जरा एकमेकांसारखे दिसू ही लागलो आहे आम्ही.

हसणं, रडणं, रागावणं, नाटक, सिनेमा

कधी नुसताच फिरायला जाणं...

किती तरी वर्षांचा सहवास आहे आमचा.

पण हल्ली घुडगे दुखतात खूप तिचे

चालायलाच जरा वेळ लागतो.

मी जरा पुढे गेलो ना तर

कोपऱ्यावर वाट पाहत थांबतोतिच्यासाठी.

कधीतरी ती येई पर्यंत एखादा

झुरका ही मारतो सिगरेट चा.

सिगरेट च्या धुरात आठवणी

बघत राहतो ती येईपर्यंत.

पण आज बराच वेळ झाला तरी

अजून अली कशी नाही ती?

माझ्या हातातली सिगरेट कुठे गेली?

मग हा धूर ही इतक्यावेळ टाकलाय कसा?

हा धूर इतक्या सगळीकडे कसा?

हे ढग आहेत की काय?

अरे देवा...मी फार पुढे निघून आलोय की काय?

मी...फार...पुढे निघून आलोय की काय?

रातराणी तुझा तो गंध

कवी: मिलिंद जोशी

रातराणी तुझा तो गंध का छळतो मला

टाळले व्हायचे ते ते पुन्हा करतो मला.

सोडली लोकलज्जा सोडले ऐकायचे

एक आवाज माझ्या आतुनी हसतो मला.

तर कसा वाटला तुम्हाला माझा हा प्रयत्न?

I hope you enjoyed the lyrics of the poems recited in this episode of Kavitecha Paan.

जर आवडला असेल तर जास्तीत जास्तीत लोकांपर्यंत हा लेख पोहोचवा. त्यांना उपयोगी पडेल.

1  1