वाचा कवितेचं पान मध्ये म्हटल्या गेलेल्या सर्व कविता!

Read the lyrics of each and every poem recited in Kavitecha Paan.

कवितेचं पान हा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये बऱ्याच सुंदर कविता ऐकायला भेटतात. पण त्या ऐकता ऐकता पाहायला भेटल्या तर आनंद द्विगुणित होतो. मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे प्रत्येक एपिसोड मधल्या कवितांचा संच. एकाच पानात. हे सगळं फक्त कवितेच्या प्रेमापोटी.

तर चला आठवूया तो एपिसोड जिथे आपले सर्वांचे लाडके नट आणि कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम आले होते. या भागामध्ये म्हटल्या गेलेल्या सर्व कविता आपल्या साठी खाली सादर केल्या आहेत. या कविता त्या कवी व कवयित्रींची प्रतिभा आहे आणि त्याचा सन्मान आपण राखुया.

So, I would like to present you the poems recited by Kishore Kadam (Saumitra) in Kavitecha Paan.

KAVITECHA PAAN | कवितेचं पान - Episode # 5

Kishor Kadam reciting his own poems

काव्यवाचन

कवी : किशोर कदम

कवितासंग्रह : आणि तरीही मी

Concept & Direction : Madhurani Gokhale - Prabhulkar

Location Courtesy : Waari Book Cafe

Camera : Alankar Misal,Prasad Jadhav,Vinay Rawal

Editing : Deepak Kolekar

Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.

----------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तंकं

कवी: किशोर कदम (सौमित्र)

मी गेल्यावर

तुला वाटेल कि आपल्या बाबांनी

वाचलीयेत ही सारी पुस्तकं

पण नाही

अर्धही वाचता आलेलं नाहीय

येणारही नाही हे ठाऊक होता मला तरी

मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं

माझ्यासाठी माझ्या बापाने

काहीच सोडलाा न्हवतं मागे
मलाही सोडता येणार नाहीय् मागे
काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी
ही काही पुस्तंकं आहेत फक्तं
जी तुला दाखवतिल वाट
चालवतिल तुला थांबवतिल
कधी पळवतिल कधी
निस्तब्धं करतिल
बोल्तं करतिल कधी
टाकतिल संभ्रमात
सोडवतिल गुंते
वाढवतिल पायाखालचा चिखल
कधी बुडवतिल तरवतिल कधी
वाहावतील कधी थोपवतील प्रवाह
अडवतिल तुडवतिल सडवतील
बडवतील हरवतिल सापडतिल
तुझ्याशी काहीही करतील
ही पुस्तंकं
तू समोर आल्यावर नेहेमीच कवेत घेउन मी माझ्यातली धडधड
तुला देण्याचा प्रयत्नं करतो
तशीच ही पुस्तंकं
उघडतील मधोमध पसरतिल हात
मिठीत घेतील तुला
आपोआप होतिल हृदयाचे ठोके
यांच्यात रहस्य् आहेत दडलेली
अनेक उत्तरंही असतील
प्रश्नांमधे कदाचित कुठेच
प्रश्नही नसतील
एक लक्षात ठेव
आपलं आयुष्यच पल्प फिक्शन कधी क्लासिक
सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल कधी कवितिक
कधी किचकट कधी सोपं असतं
लक्षात असु दे या सगळ्यात
वाईट काहिच नसतं
त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक
त्याच वेळची गरज़ असतं समज़ नसतं
मी नसेन तेंव्हा ही पुस्तकं असतील
जी नेतील तुला ज़ायचं आहे तिथं
फक्तं
मी असेन
तिथं मात्रं तुला पोहोचता येणार नाही
कारण मी आधीच
होउन गेलेलो असेन तुझ्यासाठी
एखादी कथा एखादी कादंबरी
एखादी कविता एखाद्या पुस्तंकातली
माझी आठवण आली की
या प्रचंड ढिगार्यातलं
ते एखादं पु्स्तक शोध

तुझा प्रवास बघ कसोपा होउन ज़ाईलआपण सगळेच विंगेत थांबलेले आहोत

कवी: किशोर कदम (सौमित्र)

आपण सगळेच विंगेत थांबलेले आहोत

आपण सगळेच विंगेत थांबलेले आहोत

स्टेजवर काहीतरी घडण्याची...आपल्या एन्ट्रीची

आपल्या संवादांची वाट पाहत जे कुणातरी कुठेतरी लिहीत आहे

आपल्या वाताचे संवाद कदाचित संपून ही गेले असतील

अचानक ब्लॅक आऊट होईल तेव्हा आपला रोल संपल्याचं

आपल्याला कळेल की नाही हे ही ठाऊक नाही आहे आपल्याला

आणि ब्लॅक आऊट झाल्यावर दिवे नसलेल्या मेकअप रूम मधून

नवे चेहरे नवे कपडे शोधात अंधारातून फिरत राहणं

आपल्या सगळ्यांच्याच नशिबी आहे

आपण सगळेच कुणीतरी कुठेतरी लिहायला घेतलेली पात्र आहोत

आणि आता..आपण सगळे विंगेत थांबलेले आहोत

स्टेजवर काहीतरी घडण्याची, आपल्या संवादांची, आपल्या एन्ट्रीची वाट पाहत

आपण सगळेच विंगेत थांबलेले आहोत

स्टेजवर काहीतरी घडण्याची...आपल्या एन्ट्रीची

आपल्या संवादांची वाट पाहत जे कुणातरी कुठेतरी लिहीत आहे

आपल्या वाताचे संवाद कदाचित संपून ही गेले असतील

अचानक ब्लॅक आऊट होईल तेव्हा आपला रोल संपल्याचं

आपल्याला कळेल की नाही हे ही ठाऊक नाही आहे आपल्याला

आणि ब्लॅक आऊट झाल्यावर दिवे नसलेल्या मेकअप रूम मधून

नवे चेहरे नवे कपडे शोधात अंधारातून फिरत राहणं

आपल्या सगळ्यांच्याच नशिबी आहे

आपण सगळेच कुणीतरी कुठेतरी लिहायला घेतलेली पात्र आहोत

आणि आता..आपण सगळे विंगेत थांबलेले आहोत

स्टेजवर काहीतरी घडण्याची, आपल्या संवादांची, आपल्या एन्ट्रीची वाट पाहत

तुझं माझं लग्न

कवी: किशोर कदम (सौमित्र)

तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं

तालमीची ठरलेली वेळ, ठरलेली जागा, ठरलेली दृश्य, ठरलेले संवाद

आणि नंतर मुद्दाम जमवून आणलेला प्रयोग

खरंच.. तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं

मी बोलतो, नंतर तू. किंवा तू, नंतर मी.

मी काय बोलणार हे आधीच तुला ठाऊक असतं

आणि तुझेही शब्द माझ्यात रुंजी घातलेले

कधी कोणी संवाद विसरतं भयानक पौस...

कधी कोणी न ठरलेली मूव्ह घेता..न ठरलेला गोंधळ

न ठरलेल्या भावनांचे न ठरलेले हावभाव

असा ही होता कधी कधी ...

कधीतरी अचानक संवाद संपल्या सारखे होतात

वाटत असतं मोठ्यानंordava. Ka? kashasathi? कितीदिवस?

पळून ही जात येत नाही कारण परदा पडलेला नसतो,

काहीतरी होतं मग....पाय पुढे चालू लागतो..

पुढे पुन्हा तेच सुरु...ठरलेलं हसू..ओळखीचे अश्रू

जणू कधी काही घालाच न्हवतं

तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं

माणसानं कसा अक्षरा सारखं असावं

जगण्याच्या पानावर अलगद जाऊन बसावं

शब्दासाठी ओळीओळीने न अर्थ सारखं नाचावं

एका क्षणानं दुसऱ्या आनंदानं वाचावं... - सौमित्र

तर कसा वाटला तुम्हाला माझा हा प्रयत्न?

I hope you enjoyed the lyrics of the poems recited in this episode of Kavitecha Paan.

जर आवडला असेल तर जास्तीत जास्तीत लोकांपर्यंत हा लेख पोहोचवा. त्यांना उपयोगी पडेल.सा

1  1