Kavitecha Paan - D.B. Dhamnaskar

profile
Tushar D Kadam
Jun 13, 2019   •  202 views

वाचा कवितेचं पान मध्ये म्हटल्या गेलेल्या सर्व कविता!

Read the lyrics of each and every poem recited in Kavitecha Paan.

कवितेचं पान हा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये बऱ्याच सुंदर कविता ऐकायला भेटतात. पण त्या ऐकता ऐकता पाहायला भेटल्या तर आनंद द्विगुणित होतो. मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे प्रत्येक एपिसोड मधल्या कवितांचा संच. एकाच पानात. हे सगळं फक्त कवितेच्या प्रेमापोटी.

तर चला आठवूया तो एपिसोड जिथे आपले सर्वांचे लाडके धामणस्कर सरआले होते. या भागामध्ये म्हटल्या गेलेल्या सर्व कविता आपल्या साठी खाली सादर केल्या आहेत. या कविता त्या कवी व कवयित्रींची प्रतिभा आहे आणि त्याचा सन्मान आपण राखुया.

So, I would like to present you the poems recited by D.B. Dhamnaskar in Kavitecha Paan.

source: Kavitecha Paan Youtube channel

KAVITECHA PAAN | कवितेचं पान - Episode # 35 | D. B. Dhamanaskar

Concept | Direction : Madhurani Gokhale - Prabhulkar

Camera : Raj Malusare, Snehal Wagh

Editing : Muktal Mawal

Jewellery Courtesy : Tribes Vibes ( Shilpa Pandit )
Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.

------------------------------------------------------------------------------------------------

मी

कवी:द. भा. धामणस्कर

मी..मी पृथ्वीचा..पाण्याचा चुकून शिडकावा झाला तरी उमलून येणारा.

मी..मी पाण्याचा पदरी पडेल ते स्वीकारीत विनातक्रार पुढे जाणारा.

मी..मी तेजाचा. जिवंत पानाच्या हर एक उत्सवाचा प्राण असलेला.

मी..आकाशाचा. भिंतींनी घेरला जात असताना ही आपले आकाश सांभाळणारा.

मी द भा धामणस्कर..

प्रेम करणं ही माझी

कवी:द. भा. धामणस्कर

प्रेम करणं ही माझी

उपजत पवित्र प्रेरणा आहे.मी

करतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर, आकाशावर,

उन्हावर, चांदण्यावर आणि

माणसांवरदेखिल. मला

ऐकायची नाहीत म्हणूनच तुमच्या

भयभीत मनाची प्रेम न करण्याची कारणे. मला

ऐकू येत नाही तुमची

हलक्या आवाजातील कुजबूज; मी

नाकारतो तुमचा मौल्यवान टेपरेकॉर्डर माझ्याविरुद्ध

उच्चारलेला हरेक शब्द मला पोहचवणारा…

मी फिरेन संवादत कधी जवळच्या झाडाशी, कधी

दूरच्या मेघाशी. एकटेपणा संपलेला

मी एक पुण्यात्मा आहे…मी

सर्व चराचराशी निगडित : सूर्यास्त पाहताना

मीही होतो निस्तेज; सांजवताना काळाभोर हळूहळू.

मी नष्ट होतो रात्रीच्या अंधारात आणि उगवतो

नवा दिवस उजाडताना नवा जन्म झाल्यासारखा.

विसर्जनासाठी गणपती नेताना

कवी:द. भा. धामणस्कर

विसर्जनासाठी गणपती नेताना

मला मूर्ती जड झाली, तेव्हा

उसळत्या तारुण्याचा

माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे.

मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली

चौरंगासहित.

मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर

मी एका दैवी आनंदात अकल्पित

परंपरा पुढे सरकल्याच्या....

मी पुन्हा तरूण ययातीसारखा;

माझा मुलगा जख्ख म्हातारा,

परंपरेच्या ओझ्याने वाकलेला....

मातीत ते पसरिले

कवी:नारायण वामन टिळक

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,

केलें वरी उदर पांडुर निष्कलंक;

चंचू तशीच उघडी, पद लांबवीले,

निष्प्राण देह पडला ! श्रमही निमाले !

देठाचे स्वातंत्र्य

कवी:द. भा. धामणस्कर

imagecredits: diary_of_manan @ instagram

वसंत येतो तेव्हा

कवी:द. भा. धामणस्कर

वसंत येतो तेव्हा फुले येतात असे पुस्तकात वाचलेले.

फुलें येतात तेव्हा वसंत असतो हे स्वतः पाहिलेले...

गळून पडलेली रंगीबेरंगी फुले...

ती पुरती विवर्ण झाल्याखेरीज मातीही त्यांना सामावून घेणार नाही.

वृक्षातळी पडलेली ही फुले

त्यांनी मातीशी पुनर्जन्मासाठी धरणे धरले आहे.

झाडाचा निरोप घेणारे फुल येते मी म्हणते आणि झाडाच्याच पायाशी अंग टाकते.

फुलाचं जिणं

कवी:द. भा. धामणस्कर

imagecredits: marathikavitasangraha facebook account

समुद्रविषयी

कवी:द. भा. धामणस्कर

imagecredits: lopamudra twitter account

वही मोकळी करताना

कवी:द. भा. धामणस्कर

imagecredits: lopamudra twitter account

लवकरच....

दिवे असावे कोमल हळवे

तार धुण्याची...

आजोबा कविता

तर कसा वाटला तुम्हाला माझा हा प्रयत्न?

I hope you enjoyed the lyrics of the poems recited in this episode of Kavitecha Paan.

जर आवडला असेल तर जास्तीत जास्तीत लोकांपर्यंत हा लेख पोहोचवा. त्यांना उपयोगी पडेल.

2  2

Profile of Tushar D Kadam
Tushar D Kadam   •  51w  •  Reply
Ho nakki Nilofar ji. Ya week madhye nakki add karto.
Profile of Nilofar Pathan
Nilofar Pathan  •  1y  •  Reply
Taar dhunyachi Shakya asel lavkar add kara
Profile of Nilofar Pathan
Nilofar Pathan  •  1y  •  Reply
Thanks for the lyrics.
Profile of Vivek Bonde
Vivek Bonde  •  1y  •  Reply
Khup sundar aahe.... Nava paryay