सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या ची कहाणी ( The Story Behind The Marathi Song "Sunya Sunya Maifilit Majhya")

profile
Tushar D Kadam
Jun 13, 2019   •  343 views
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे. अजूनही वाटते मला की अजून ही चांद रात्र आहे. - सुरेश भट

imagesource: www.sureshbhatt.in

मी आपल्यासमोर सादर करत आहे पंडित मंगेशकरांनी या गाण्याबद्दल पुरवलेली माहिती. अगदी तसच्या तसं ...त्यांच्याच शब्दात. मराठी सा रे ग म प च्या सेट वर त्यांनी ही माहिती दिली होती.

I am presenting you the exact words of Pandit Hridaynath Mangeshkar on the story behind this song. He shared this story on the sets of Marathi Sa Re Ga Ma Pa. Enjoy!

imagesource: beaninspirer.com

बघूया ते गझल, सुरेश भट आणि सुन्या सुन्या ... बद्दल काय बोलले होते:

" या गाण्यासंबंधीत बोलणं आवश्यक आहे.

imagesource: wikipedia.com

सर रिचर्ड बर्टन नावाचे थोर लेखक होऊन गेले आहेत. संशोधक होते. त्यांची ग्रंथ संपदा एवढी मोठी आहे की अक्षरशः एक संपूर्ण मोठाच्या मोठा सभागृह भरेल इतकी त्यांनी ग्रंथ संपदा केली. अरबी कपडे घालून मक्का मदिना ला ते जाऊन आलेत. नाईल नदी चा त्यांनी शोध लावला. असं विचित्र ते व्यक्तिमत्व आणि अगदी प्रतिभावान ते व्यक्तिमत्व.

त्यांनी एका ठिकाणी एक छान वाक्य लिहून ठेवलेलं आहे की " मोठं वय मिळणं म्हणजे स्वजनांच्या थडग्याला ठेचाळत ठेचाळत स्वतःचे पाय रक्तबंबाळ करून घेणे. " आज मला त्याच गोष्टीची जाणीव होते. आज ती स्मिता नाही आहे. आज ते सुरेश भट नाही आहेत. आज त्यांच्याकडून ते गाणं लिहून घेणारी जयश्री गडकर नाही आहे. आता सगळ्यांच्या आठवणी माझ्या मनात अतिशय दाटून आलेल्या आहेत.

imagesource: celebrityborn.com

imagesource: jivani.com

एक चित्रपट होता अमृतवेल वी. स. खांडेकरांच्या कादंबरीवर. आणि त्याच्या निर्मात्या होत्या जयश्रीबाई गडकर. मला संगीत दिलं आणि कवी सुरेश भट यांना गीत. आज जे दादरचा अमिगो नावाचं हॉटेल आहे तिथे आम्ही त्यांना उतरवलं. त्या वेळी मराठी गाण्यासाठी कवी ला२००० रुपये मिळायचे. हॉटेल चं भाडं होतं दिवसाला ५०० रुपये. ७ - ८ हजार रुपये बिल झाला तरी भट साहेब एक ही ओळ लिहीनात. तर मी आणि जयश्री बाई आणि त्यांचे पती आम्ही तिघेही घाबरलो, त्यांना भेटायला गेलो.

imagesource: releasesoon.com

भट अचानक माझ्याशी हिंदी मध्ये बोलायचे. मी म्हटलं " भट साहेब. तुम्हे गाणं कधी लिहिणार? ". ते हिंदी मध्ये म्हटले की सुचेल तेव्हा लिहील. कदाचित सहा महिन्यात ही. मी म्हटलं हॉटेलचं बिल चित्रपट पेक्षा जास्त होईल. तर मग असा ठरलं की त्यांनी गाणं लिहायचं नाही. आणि दुसऱ्यादिवशी हॉटेल सोडलं. बिल झाला होतं आठ हजार रुपये. तर जयश्री बाई म्हणाल्या कि मी बिल भरते. आप बिल मत भारीये.माईन तोच याह. ये बिल बाळ भर देगा. म्हणजे मी. तर माझ्या बरोबर अरुण दाते होते. मी म्हटलं मी कशाला तुमचा हा मित्र आहे आम्ही दोघं बिल भरतो. तर अरुण दाते यांनी डोक्याला हात लावून घेतला.

तर भट साहेब टॅक्सी मध्ये बसले आणि अचानक एका माणसाला बिलाचा कागज आणायला सांगितला. तो कागद आण तिकडचा असे त्याला म्हणाले. आणि त्या कागदावरती एक हाती त्यांनी हे गाणं लिहिला की; "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे. अजूनही वाटते मला की अजून ही चांद रात्र आहे." आणि ते गाणं वाचून जयश्री बाईंच्या डोळ्यात पाणी आलं.

imagesource: picdove.com (some information in the above picture is subjected to that time).

imagesource: bookmyshow.com

आणि त्यांचे पती बाळ धुरी यांनी १५ हजार रुपयांचा चेक काढला आणि भट साहेबांना दिला. भट साहेबांनी तो चेक त्यांना परत केला. इथे प्रतिभा म्हणजे काय याचा साक्षात्कार होते. तर भट साहेबांनी त्यांना तो चेक परत केला तर माझा आणि अरुण दाते यांचा चेहरा पडला. ८ हजार आमचे गेले म्हणजे. तर भट साहेबांनी तो चेक परत केल्यावर सांगितला की मी माझी प्रतिभा विकत नसतो. " ये आमद हैं जो अचानक आई हैं. मैं आपको बेच नहीं सकता हूँइसको. " आणि त्यांच्या हातात कागद देऊन ते निघून गेले.

imagesource: wikipedia.com

imagesource: timesofindia.com

कालांतराने हा चित्रपट नाही निघाला. " उंबरठा " मध्ये हे गाणं घेण्यात आला. त्या प्रसंगानुसार त्यांनी असं लिहिलं होतं " कळे न मी पहाटे कोणाला. कळे न हा चेहरा कुणाचा. पुन्हा पुन्हा भास होत आहे. 'कुणीतरी' आरशात आहे. " जबार पटेल म्हणाले अहो ती लग्न झालेली बाई आहे. ' कुणातरी ' म्हटलं तर काही वेगळा अर्थ निघतोय. तर मी भट साहेबांना म्हटलं की हा शब्द बदला.भट साहेब म्हटले " मैं आपने लफ्ज़ बदलता नहीं हूँ.". ते कही शब्द बदलायला तयार होइनात. का होईनात? तर त्यांना तेव्हा सुचत न्हवतं. तर शेवटी त्यांनी माझ्यावर राग काढला. " तू अपने इस्पे काम करो गाने मैं. दखलंदाज़ी मेरे लिखने में मत करो. " मी गप्प राहिलो. बराच वेळ गेला. दीदी वाट बघत होती कानाला हेडफोन लावूनकी आता गाणं सुरु होईल. सगळं तयार होता. पण या एका शब्दावर गाण अडकलेलं होतं.

imagesource: questingbandstand.com

imagesource: saregama.com

आणि तेवढ्यात शांत बाई शेळके दीदी ला भेटायला आल्यात. आज त्या पण नाही आहेत. त्यांची पण मला आठवण येते. आणि त्यांना ही अडचण सांगण्यात आली की हा शब्द त्या बदलत नाही आहेत आणि त्याच्यामुळे हे गाणं अडकलेलं आहे. तर त्या म्हणाल्या की किती सोपा आहे " कळे न मी पहाटे कोणाला. काळे न हा चेहरा कुणाचा. पुन्हा पुन्हा भास होत आहे.. 'तुझे हसू आरशात आहे. "

वजन बघा तेच आहे गझलचेच वजन आहे. अर्थाला बरोबर जातं आणि चित्रपटाच्या प्रसंगाला ही बरोबर जात आहे. तर भट साहेब म्हणाले " वा शांता ! ". तर मी म्हटलं की भट साहेब आहो त्या शांताबाई आहेत. ते म्हणाले " शांताबाई हैं मुझे पता है. ऐसा लिख गयी कि वाह शांता निकाल गया मुह से. "

तर अशा प्रतिभावान लोकांबरोबर मला काम करायला मिळालं हा माझ्या आयुष्यातला अतिशयभाग्याचा क्षण आहे. आणि हा दुःखाचा क्षण आहेत कारण सुरेश भट नाही आहेत. ते गाणं लिहून घेणाऱ्या जयश्री बाई नाही आहेत. त्याच्या मध्ये एकाच ओळ मानाने टाकणाऱ्या शांताबाई नाही आहेत. आणि हे गाणं दीदी गात असताना अक्षरशः लहान मुलासारखा धाय धाय रडलेली स्मिता पाटील ही इथे नाही आहे. :( "

खरंच.. पंडित मंगेशकरांचा शब्द काळजाला भिडतात. त्यांनी घेतलेला अनुभव आपल्याला समृद्ध करून ठेवतो. सुरेश भटांच्या कविता आपल्यासाठी प्रेमिके हुन हि प्रिय आहेत. शांताबाई आपल्या लाडक्या आहेत. लता दीदी शरावती माता आहेत. आणि स्मिता पाटील ही नेहमी तिच्या सुंदर अभिनयाने आपल्या काळजात घर करून जाते.

तर कसा होता हा किस्सा?

Please do let me know how was this story. Keep reading :)

1  1

Profile of Tushar D Kadam
Tushar D Kadam   •  1y  •  Reply
Kharach...he sagle mandali khupach great aahet!
Profile of Tejaswini Kadam
Tejaswini Kadam  •  1y  •  Reply
Sundar..... 👌👌👌👌👌